'या' म्युझिक व्हिडीओमुळे कंदील बलोचची हत्या?
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2016 05:49 AM (IST)
लाहोर : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचच्या हत्येमुळे अनेक जण अद्याप सावरले नाहीत. कंदीलचा भाऊ वासिमनेच तिची गोळ्या घालून हत्या केली. कुटुंबाची प्रतिष्ठेसाठी भावाने कंदीलची हत्या केल्याचं समजतं. विविध कारणांमुळे कंदीलची हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे म्युझिक व्हिडीओ. 7 जुलै रोजी कंदीलचा 'बॅन' हा वादग्रस्त व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच वासीमने कंदीलाचा खून केल्याचं समजतं. पाहा व्हिडीओ संबंधित बातम्या