नवी दिल्ली : देख भाई देख, कुसुम, कुमकुम यासारख्या हिंदी मालिका आणि देवयानी सारख्या मराठी मालिकेत झळकलेला टीव्ही अभिनेता सीबीआयच्या रडारवर आहे. अनुजच्या शोधासाठी दिल्लीत सीबीआयने छापे टाकले आहेत.

 
अनुजने लाच देण्यासाठी दिल्लीत मध्यस्थाचा शोध घेतला होता. याप्रकरणातला दलाल विश्वदीप बन्सलला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र अनुजभोवती कायद्याचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.

 
अनुजच्या एल्डर फार्मास्युटिकल कंपनीच्या माध्यमातून परदेशातील कंपन्यांनाही पैसा पुरवण्यात आला होता. दुबई आणि बल्जेरियासह अन्य देशात पैसा पाठवला गेल्याचा संशय आहे. अनुजच्या कंपनीवर 138 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याची चौकशी करणारा अहवाल दाबण्यासाठी लाच घेतल्याचं वृत्त आहे.