Arbaj Shaikh : सैराटमधील सल्याला म्हणजेच अरबाज शेखला (Arbaj Shaikh) पुण्यातील रिक्षाचालकाने त्रास दिला आहे. फेसबुक पोस्ट करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. रिक्षाचालक मीटरप्रमाणे येण्यास नकार देत मनमानी भाडे आकारत आहेत. रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. हे सर्व प्रकार थांबावेत यासाठी अरबाजने फेसबुक पोस्ट केली आहे.
अरबाजने लिहिले आहे, पुण्यात रिक्षावाल्यांकडून लूट.. सगळेच रिक्षावाले असे असतील असे नाही. नांदेड सिटी ते पुणे स्टेशनला यायला 198 रुपये होतात. मी कधीच ओला, उबेर, रॅपिडो सारख्या अॅपचा वापर करत नाही. पाऊस असल्याने मित्राला सोडण्यासाठीदेखील नकार दिला. त्यामुळे मित्राने मला रॅपिडोवरून रिक्षा करून दिली. पाऊस चालू होता. नांदेड सिटीमधून रिक्षा निघाली. त्याने मला खूप फिरवले. मी त्याला म्हटलं दादा तू खूप फिरवतो आहेस. त्यावर त्याने काहीही उत्तर दिलं नाही".
अरबाजने पुढे लिहिलं आहे," प्रवासादरम्यान 60 रुपये जास्तीचे मागायला त्याने सुरुवात केली. मी का असा प्रश्न उपस्थित केल्यावर त्या रिक्षाचालक मला शिवी देत म्हणाला, पाऊस सुरू आहे. तू इथेच उतर. जास्त बोलू नको. मी रोज रिक्षा चालवतो...तू नाही. तुला 60 रुपये जास्तीचे द्यावे लागतील. नाहीतर इथेच उतर.'
पाऊस सुरू असल्याने तसेच ट्रेन पकडायची असल्याने अरबाज प्रवासादरम्यान उतरू शकला नाही. पण हा प्रकार थांबावा यासाठी अरबाजने लिहिलं आहे, माझ्यासारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर अशा प्रसंगांचा सामना करावा लागत असेल तर गावावरून/फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील...त्यांची हे लोक किती लूट करत असतील. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढेल".
मराठी कलाकारांना रिक्षाचालकांकडून मनस्ताप
अरबाजआधी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रताप याच्यासोबत रात्री प्रवास करताना एक थरारक घटना घडली होती. त्यानंतर अभिनेत्री अभिज्ञा भावेसोबतदेखील असाच थरारक प्रसंग घडला होता. दोघांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती."
संबंधित बातम्या