Allu Arjun First Look From Pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्नाच्या (Rashmika Mandana) 'पुष्पा' (Pushpa) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अल्लू अर्जुनचा फर्स्ट लुक समोर आला आहे. 


'पुष्पा 2'चे सिनेमॅट्रोग्राफर मिरोस्ला ब्रोजेक यांनी 'पुष्पा 2'च्या शूटिंगदरम्यानचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिरोस्ला आणि अल्लू अर्जुन 'पुष्पा: द रूल' संबंधित चर्चा करताना दिसत आहेत. या सिनेमात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिलदेखील दिसणार आहे. 






'पुष्पा: द राइज' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. डिसेंबर 2021 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा कमाई केली आहे. आता 'पुष्पा : द रूल' (Pushpa: The Rule) या सिनेमाची निर्मिती 500 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात येणार आहे. 


'पुष्पा : द रूल' हा सिनेमा 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा: द राइज' प्रमाणे 'पुष्पा : द रूल'देखील बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवेल का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 
'पुष्पा: द राइज' या सिनेमाचं दिग्दर्शन सुकुमारने केलं होतं. तर 'पुष्पा: द रूल'च्या दिग्दर्शनाची धुरादेखील सुकुमारचं सांभाळणार आहेत. या सिनेमातील डायलॉग, कथानक आणि सिनेमातील गाण्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.   


संबंधित बातम्या


Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द रूल'च्या शूटिंगला सुरुवात; निर्मात्यांकडून फोटो शेअर