Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला (Tiger Shroff) अॅक्शन स्टार म्हणून ओळखले जाते. तो स्टंट आणि डान्स मुव्ह्जमुळे अनेकदा चर्चेत असतो. फिटनेससाठीदेखील टायगर ओळखला जातो. आता टायगरचा पाय मोडल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने पाय मोडल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
टायगर श्रॉफने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय आहे?
टायगरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो बेसिन तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"काँक्रीटचे वॉश बेसिन फोडताना माझा पाय मोडला आहे. मला वाटले होते की मी आधीपेक्षा जास्त बलवान आहे. टायगरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याला काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.
टायगरने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील कमेंट करताना दिसत आहेत. शिल्पाने कमेंट करत लिहिलं आहे,'OMG'. दिग्दर्शक साबीर खानने लिहिलं आहे,"24 तास सलग शूट केलं त्या दिवसाचा हा व्हिडीओ आहे". साबीरच्या कमेंटमुळे टायगरने शेअर केलेला व्हिडीओ थ्रोबॅक व्हिडिओ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टायगर श्रॉफचे आगामी सिनेमे
टायगर श्रॉफचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. त्याचा 'गणपत' आणि अक्षय कुमारसोबतचा 'बडे मिया छोटे मिया' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'गणपत' सिनेमात टायगर कृती सेननसोबत दिसणार आहे. टायगरच्या 'हीरोपंती 2' या सिनेमाने गेल्या काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला.
संबंधित बातम्या