Pushpa Box Office : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 
17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केली आहे. तेलुगू व्यतिरिक्त हा सिनेमा हिंदी, मल्याळम, कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. 


हिंदी रिमेकनेदेखील केली कमाई
हिंदी रिमेकने 56 कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी सिनेमाने 3.50 कोटींची कमाई केली आहे. तर शनिवारी 6.10 कोटींची कमाई केली आहे. लवकरच सिनेमा 75 कोटींचा आकडा पार करणार आहे.





 बॉक्स ऑफिसवर केली 300 कोटींची कमाई 
'पुष्पा: द राइज' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. अल्लू अर्जुनच्या अभिनयाचेदेखील चाहते कौतुक करत आहेत. . या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 71 कोटी रुपयांचा व्यवसाय केला तर केवळ तीन दिवसात 173 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. संपूर्ण देशभरात एकाच वेळी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा हा पहिलाच चित्रपट आहे.


'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन  देवी श्री प्रसाद यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. 


संबंधित बातम्या


83 Movie : कोरोनाचा 83 च्या कमाईवर परिणाम, लवकरच OTT वर प्रदर्शित होणार?


Bollywood Upcoming Films : 'या' हिट सिनेमांचे सिक्वेल 2022 मध्ये होणार प्रदर्शित


John Abraham :  बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; अभिनेता जॉन अब्राहमला कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha