83 Movie : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कबीर खानचा '83' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. चांगली कथा, उत्तम कलाकार असूनदेखील हा सिनेमा फारशी कमाई करू शकला नाही. पहिल्या दिवशी सिनेमाने सुमारे 15 कोटींची कमाई केली होती. 'सूर्यवंशी' आणि 'पुष्पा' सिनेमापेक्षा ही कमाई खूपच कमी होती. 10 दिवसांनंतरही हा सिनेमा जगभरातून 150 कोटींचा गल्ला जमवू शकला आहे. त्यामुळेच आता निर्माते हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. 


ओटीटीवर प्रदर्शित होणार '83'
कोरोनाचा '83' च्या कमाईवर मोठा परिणाम झाला आहे. कबीर खान म्हणाले, 83 सिनेमा 18 महिन्यांपूर्वीच तयार झाला होता. पण प्रेक्षकांनी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहावा अशी माझी इच्छा होती. त्यामुळेच सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलले.  


कोरोनाचा 83 च्या कमाईवर परिणाम
कोरोनामुळे 83 च्या कमाईवर परिणाम झाला आहे हे खरे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असूनदेखील 'पुष्पा' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. दरम्यान 83 सिनेमाला संघर्ष करावा लागतो आहे. 83 च्या तुलनेत प्रेक्षक पुष्पा सिनेमासाठी अधिक उत्सुक दिसत आहेत. 


'83' सिनेमाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे. सिनेमात रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर सिनेमात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना मुख्य भूमिकेत आहे. कपिल यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरने बरीच मेहनत घेतली आहे.


संबंधित बातम्या


83 Box Office Collection : '83' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई, चार दिवसांत कमावले 54.29 कोटी


Prem Chopra : बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रांना कोरोनाची लागण, लीलावती रुग्णालयात दाखल


Bollywood Upcoming Films : 'या' हिट सिनेमांचे सिक्वेल 2022 मध्ये होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha