Pushpa 2 FIRST Song Out Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ( Allu Arjun) बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा: द रुल'मधील (Pushpa The Rule) पहिले गाणं आज रिलीज करण्यात आले. 'पु्ष्पा 2'मधील गाण्याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. रॉकस्टार डीसीपीने लिहिलेले पुष्पा...पुष्पा हे गाणं सहा भाषेत रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीमने याआधी एक टीझर लाँच केला होता. त्यात 1 मे रोजी 'पुष्पा 2'मधील पहिलं गाणं रिलीज होणार असल्याचे सांगितले होते. 


'पुष्पा-पुष्पा' या गाण्याच्या लिरिकल व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.  अल्लू अर्जुनच्या स्टेप्सने चाहत्यांची मने जिंकली आहे. या गाण्यातील अल्लू  अर्जुनच्या दमदार हुक स्टेपने 'पुष्पाः द राइज'च्या पदार्पणापासूनच पॉप कल्चरचा एक भाग बनलेल्या 'पुष्पाइझम'ची क्रेझ वाढवली आहे. 


6 भाषांमध्ये गाणे झालं रिलीज


'पुष्पा 2' मधील गाणं  'पुष्पा-पुष्पा' 6 भाषांमध्ये रिलीज झाले आहे. तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये रिलीज करण्यात आले आहे. देवी श्री प्रसाद यांनी गाण्याच्या वेगवेगळ्या व्हर्जनसाठी नकाश अझीझ, दीपक ब्लू, मिका सिंग, विजय प्रकाश, रणजीत गोविंद आणि तिमिर बिस्वास यांसारख्या लोकप्रिय गायकांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध केले आहे. 


'पुष्पा 2' कधी रिलीज होणार? (Pushpa 2 Release Date)


'पुष्पा 2 - द रुल' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे.  या चित्रपटाचे बजेट 500 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये 'पुष्पा 2'चा समावेश असणार आहे. 'पुष्पा 2: द रूल' (Pushpa 2 : The Rule) हा 'पुष्पा : द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटाचा सीक्वेल असणार  आहे. 'पुष्पा'च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


 पाहा व्हिडीओ : पुष्पा...पुष्पा...पुष्पा राज..;'पुष्पा 2' मधील पहिले गाणं रिलीज



रिलीज आधीच कमाई 


पुष्पा 2 चे बजेट 500 कोटी रुपये आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जगभरातील संगीताचे हक्क आणि हिंदी सॅटेलाइट हक्क टी-सीरीजला 60 कोटी रुपयांना विकले आहेत. 'स्टार मां' या वाहिनीने तेलुगू सॅटेलाइट राइट्सही विकत घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही डील किती रुपयांमध्ये झाली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. 


इतर संबंधित बातमी :