मुंबई : मुंबईतल्या लोखंडवाला परिसरात अभिनेता शेखर सुमनच्या घराबाहेर राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. 'पद्मावती' प्रकरणानंतर शेखर सुमनने करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा इशारा दिला होता.


राजपूत करणी सेनेचे कार्यकर्ते गुजरात आणि राजस्थानवरुन मुंबईत आले. रविवारी सकाळी त्यांनी शेखर सुमन यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. शेखर सुमन घरी नसल्यानं आपण पुन्हा येऊन पब्लिसिटी काय असते हे दाखवून देऊ असा इशारा त्यांनी दिला.

'पद्मावती' चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना मारहाण आणि सेटची मोडतोड झाल्यानंतर शेखर सुमननं राजपूत करणी सेनेचा निषेध केला होता. तसंच कार्यकर्त्यांना मारहाण करण्याबाबतही वक्तव्य केलं होतं.

जयपूरमधील जयगडमध्ये सुरु असलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. राजपूत समाजाशी संबंधित करणी सेना या संघटनेने हा हल्ला केला.

चित्रीकरणादरम्यान पद्मावतीची भूमिका करणारी दीपिका आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील रणवीर सिंहवर काही दृश्यं चित्रित करण्यात येत होती. ही दृश्यं चुकीची असल्याचं सांगत करणी सेनेने हल्ला केला.

संबंधित बातम्या :


'पद्मावती'नंतर 'टॉयलेट...'च्या दिग्दर्शकालाही हिंदू समितीचा इशारा


भन्साळींच्या समर्थनार्थ सुशांतने 'राजपूत' आडनाव हटवलं


भन्साळी मारहाणप्रकरणी सोनम कपूरचं पंतप्रधानांना आवाहन


भन्साळी मारहाण प्रकरण, पद्मावतीची भूमिका साकारणारी दीपिका म्हणते...


आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?


भन्साळी मुंबईला परतणार, 'पद्मावती'चं शूटिंग रद्द


भन्साळींवरील हल्ल्याविरोधात बॉलिवूड एकवटलं


जयपूरमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मारहाण