मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 2' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळाली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 13.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
https://twitter.com/taran_adarsh/status/830288251319521280
सर्वाधिक ओपनिंग मिळालेला 'जॉली एलएलबी 2' यंदाच्या वर्षातील दुसरा चित्रपट ठरला आहे. मात्र 'जॉली एलएलबी 2'ला शाहरुख खानच्या 'रईस'चा विक्रम मोडता आलेला नाही. हृतिक रोशनच्या 'काबील'सोबत प्रदर्शित होऊनही 'रईस'ने पहिल्या दिवशी 20.42 कोटींची कमाई केली होती.
https://twitter.com/taran_adarsh/status/824523296456708097
'जॉली एलएलबी 2' च्या तुलनेत 'रईस' कम स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. 'जॉली एलएलबी 2' 3600 स्क्रीन तर 'रईस' 2500 स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता.
सुभाष कपूर दिग्दर्शित 'जॉली एलएलबी 2' शुक्रवारी (10 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला होता. 2013 मधील 'जॉली एलएलबी'चा सिक्वेल आहे.
REVIEW : जॉली एलएलबी 2
'जॉली एलएलबी 2' सोबत आणखी कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा संपूर्ण फायदा मिळेल. त्यामुळे वीकेण्डला चित्रपट चांगली कमाई करण्याची अपेक्षा आहे.
अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 2' ला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सुट्टीचा दिवस नसतानाही लोक सिनेमा पाहत आहे, असं फॉक्स स्टार स्टूडियोजचे सीईओ विजय सिंह म्हणाले.
'जॉली एलएलबी 2' मध्ये अक्षय कुमारसह अन्नू कपूर, हुमा कुरेशी आणि सौरभ शुक्लाही प्रमुख भूमिकेत आहेत.