मुंबई: बॉलीवूडनंतर हॉलीवूडमध्येही आता स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करू पाहात असलेल्या, प्रियंका चोप्राला कोणत्याही चौकटीत बंधिस्त न राहता एक यशस्वी अभिनेत्री बनण्याची इच्छा आहे. कॅनडातील एक फॅशन मॅगझीन 'फ्लेयर'ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपली ही इच्छा व्यक्त केली.

 

प्रियंकाने अमेरिकेतील टिव्ही मालिका 'क्वांटिको'मधून अंतरराष्ट्रीय क्षेत्रात पदार्पण केले. आता ती हॉलीवूडच्या 'बेवॉच' या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

 

तिने दिलेल्या मुलाखतीत, प्रत्येकाने तिच्यातील दोष हेरून निदर्शनास आणून द्यावेत, जेणेकरून त्या चुका तिला सुधारता येतील.

 

''एक अभिनेत्री, आणि गायिकेपेक्षाही मला अजून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आहे. जीवनात एक यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी आपली कठोर परिश्रम करण्याची तयारी,'' असल्याचेही तिने सांगितले.

 

प्रियंका सध्या 'क्वांटिको'च्या दुसऱ्या पर्वाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. तिने स्वत:ला कार्यमग्न राहण्यामागे भारतीयत्व असल्याचे सांगितले आहे.