जयपूर: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचे लग्न अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपले आहे. त्यासाठी प्रियांका आणि निक आज राजस्थानमध्ये पोहोचले. दोघांची झलक पहाण्यासाठी विमानतळावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रियांका-निकसोबत निकचा मोठा भाऊ जो जोनास आणि त्याची मंगेतर सोफी टर्नर होते. विमानतळावरुन थेट जोधपूरच्या उमेद भवन या लग्नास्थळी पोहोचले.
विधीला सुरुवात
येणाऱ्या 1 डिसेंबरला प्रियांका आणि निक लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी आज दुपारच्या जेवणानंतर लग्नापूर्वीच्या विधी पार पडणार आहेत. जोधपूरच्या आलिशान हॉटेल उमेद भवनमध्ये शाही पद्धतीने हा विवाह पडणार आहे. त्यासाठी बुधवारपासूनच लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
दोन पद्धतीने लग्न
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच नुकतेच इटलीत लग्न पार पडला. या दोघांनी कोंकणी आणि सिंधी अशा दोन पद्धतीने लग्न केले होते. त्याचप्रमाणे प्रियांका आणि निक हे दोघेही दोन पद्धतीने लग्न करणार आहेत. 1 डिसेंबर रोजी ख्रिश्चन तर 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने अशा दोन पद्धतीने लग्न करणार आहेत. लग्नानंतर 4 डिसेंबरला दिल्लीत ग्रॅंड रिसेप्शन होणार आहे.
शाही थाटात लग्न
प्रियांका आणि निकने लग्नासाठी राजस्थानमधील सर्वात महागडा हॉटेल उमेद भवन 4 दिवसासाठी बुक केलं आहे. यावेळी अन्य कोणालाही रुम दिली जाणार नाही. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी एकूण 64 आलिशान रुम्स, 22 पॅलेस रुम आणि 42 स्वीट्स बुक केले आहेत. या चार दिवसाचे भाडे तब्बल 4 कोटीपर्यंत असावे, असं सांगितल जात आहे.
प्रियांका-निक लग्नासाठी राजस्थानात दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Nov 2018 02:38 PM (IST)
प्रियांका आणि निक आज राजस्थानमध्ये पोहोचले. दोघांची झलक पहाण्यासाठी विमानतळावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रियांका-निकसोबत निकचा मोठा भाऊ जो जोनास आणि त्याची मंगेतर सोफी टर्नर होते. विमानतळावरुन थेट जोधपूरच्या उमेद भवन या लग्नास्थळी पोहोचले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -