Priyanka Chopra Reveals Daughter Face: 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच (Bollywood) हॉलिवूडमध्येही (Hollywood) विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) हे सरोगसीच्या माध्यमातून 2022 मध्ये आई-वडील झाले. प्रियांकानं तिच्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) असं ठेवलं. प्रियांका ही मालतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण आतापर्यंत प्रियांकानं मालतीचा चेहरा तिच्या चाहत्यांना दाखवला नव्हता. आता 30 जानेवारी रोजी प्रियांकानं तिच्या लेकीसोबत एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी पहिल्यांदाच मालतीचा चेहरा सर्वांना दिसला. 


प्रियांकाचा पती निक जोनस आणि त्यांच्या भावांचा समावेश हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये झाला आहे. त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रियांकानं मालतीसोबत हजेरी लावली. यावेळी प्रियांकानं ब्राउन कलरचा बॉडीकॉन ड्रेस, टोन्ड मेकअप, गॉगल आणि गोल्डन इअरिंग्स असा लूक केला होता. तर मालती ही क्रीम स्वेटर आणि मॅचिंग शॉर्ट अशा क्युट लूकमध्ये दिसली. हॉलिवूड वॉक ऑफ फेमच्या इव्हेंटमधील फोटो आणि व्हिडीओ प्रियांकानं शेअर केले. यामध्ये निक हा स्टेजवर भाषण देताना दिसत आहे तर मालती आणि प्रियांका त्याचं भाषण ऐकत आहेत, असं दिसतंय. 


नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स 


प्रियांकानं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'मालतीला पहिल्यांदाच पाहिलं, तिची नजर काढ' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मालती खूप सुंदर दिसतेय.'






प्रियांकाचे आगामी चित्रपट


'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या चित्रपटामधून आणि सिटाडेल या वेब सीरिजमधून प्रियांका ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी'  हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. तसेच ती फरहान अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटामध्ये देखील प्रियांका मुख्य भूमिका साकारणार आहे. प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. बाजीराव मस्तानी,दिल धडकने दो, डॉन-2, मेरी कोम, बर्फी, द स्काय इज पिंक या चित्रपटांमध्ये प्रियांकानं काम केलं. प्रियांका ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Priyanka Chopra : कौतुकास्पद! प्रियांका चोप्रा ठरली British Vogue मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री