Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाला 'ग्लोबल स्टार', असंही म्हटलं जातं. 'देसी गर्ल' प्रियांकाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. आता प्रियांका ही ब्रिटिश वोग मासिकावर (British Vogue Magazine)  झळकली आहे. प्रियांका ही या मासिकाच्या कव्हरपेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री  ठरली आहे. 

Continues below advertisement


प्रियांकाचा क्लासी लूक


ब्रिटिश वोगच्या इन्स्टाग्राम पेजवर प्रियांकाचे काही फोटो दिसत आहेत. या फोटोमध्ये प्रियांका क्लासी लूकमध्ये दिसत आहे. पिवळ्या कलरचं जॅकेट अन् मोकळे केस अशा लूकमध्ये ती दिसत आहे. प्रियांकाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच ब्रिटिश वोगच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये प्रियांका ही तिच्या मुलीसोबत पोज देताना दिसत आहे.






प्रियांकाचे आगामी चित्रपट 


प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या चित्रपटामधून आणि सिटाडेल या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिटाडेल  या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे.  'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी'  हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, हा चित्रपट कॅरोलिन हरफर्थच्या 2016 च्या जर्मन चित्रपट `SMS फर डिच` वर आधारित आहे. 


फरहान अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटामध्ये देखील प्रियांका प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात प्रियांकासोबतच अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेत्री कतरिना कैफ या देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


प्रियांकाच्या 'या' चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती 


प्रियांकाच्या बाजीराव मस्तानी,दिल धडकने दो, डॉन-2, मेरी कोम, बर्फी, द स्काय इज पिंक या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रियांकानं व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली लेकीची पहिली झलक; पीसी की निक कोणासारखी दिसतेय मालती? युझर्स म्हणाले,'ती...'