मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेता निक जोनास यांच्या बहुप्रतीक्षित विवाहाची तारीख ठरली आहे. 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर असे तीन दिवस हा शाही विवाहसोहळा रंगणार आहे. जोधपूरमधील राजवाड्यात पारंपरिक पद्धतीने दोघं लगीनगाठ बांधणार आहेत.
निकला समुद्र किनारे पसंत असल्यामुळे दोघं हवाई बेटावर लग्नबंधनात अडकण्याची शक्यता सुरुवातीला वर्तवली जात होती. मात्र काही दिवसांपूर्वी प्रियंका आणि निक राजस्थानातील राजवाड्यांची पाहणी करुन आले होते. त्यानंतर दोघं 'रॉयल डेस्टिनेशन वेडिंग' करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
निकच्या मागे हॉलिवूडमधील फोटोग्राफर्सचा ससेमिरा आहेच, त्यात प्रियंका चोप्रा आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व झाल्याने भारतातसोबतच परदेशी चाहतेही तिच्या मागे आहेत. त्यामुळे कोलाहल आणि झगमगाटापासून दूर राहून लग्न करण्याचा दोघांचा मानस आहे.
प्रियंका-निकच्या लग्नाला मोजक्या पाहुण्यांची उपस्थिती असेल. मित्र, नातेवाईक मिळून केवळ दोनशे जणांना निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती आहे.
प्रियंका आणि निक यांनी 18 ऑगस्ट रोजी भारतीय पद्धतीने रोका (साखरपुडा) केला. 'टेकन... विथ ऑल माय हार्ट अँड सोल' अशा मोजक्या शब्दात प्रियंकाने आपण एंगेज्ड झाल्याचं इन्स्टाग्रामवरुन जाहीर केलं होतं. स्क्वेअर कट डायमंड जडवलेली अंदाजे 2.1 कोटी किमतीची अंगठी निकने प्रियंकाला दिली.
निक आणि प्रियंका यांच्या लग्नाला रॉयल दाम्पत्य हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लंडचे प्रिन्स हॅरी आणि डचेस मेगन मार्कल उपस्थित राहण्याचे संकेत आहेत.
26 वर्षांचा निक जोनस अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. प्रियंका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. प्रियंकाने भूमिका केलेल्या 'काँटिको' मालिकेतील तिचा सहकलाकार ग्रॅहम रॉजर्सने दोघांची ओळख करुन दिली होती.
संबंधित बातम्या :
निकने प्रियंकाला दिलेल्या अंगठीची किंमत...
निकसोबत लग्नासाठी प्रियांका चोप्राने 'भारत' सोडला?