Priyanka Chopra: जॉयलँड (Joyland) हा पाकिस्तानी (Pakistan) चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ऑस्करमधील बेस्ट इंटरनॅशनल फिचर या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्टेड करण्यात आलं आहे. जॉयलँडचे दिग्दर्शन सॅम सादिक (Saim Sadiq) यांनी केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 4 नोव्हेंबरला रिलीज झाला. त्यानंतर या सिनेमावर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली. पण नंतर ही बंदी हटवण्यात आली आहे. आता या चित्रपटाचं अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) कौतुक केलं आहे. प्रियांकाने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं.
प्रियांकाची पोस्ट
प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन जॉयलँड या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये प्रियांकाने लिहिलं, "जॉयलैंड इज ट्रूली ए जॉय टू वॉच, ही कथा आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मी या चित्रपटाच्या टीमचं कौतुक करते. हा चित्रपट नक्की बघा."
92 देशांमधील चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कॅटेगरीसाठी "जॉयलँड" हा चित्रपट एलिजिबल होता. "जॉयलँड" हा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या 15 चित्रपटांपैकी एक आहे. या यादीत भारताच्या छेल्लो शो या चित्रपटाचा देखील समावेश आहे.
जॉयलँडने कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील Un Certain Regard And Queer Palm या कॅटेगिरीतील ज्युरी पुरस्कार जिंकला होता. सानिया सईद, अली जुनेजो, अलीना खान, सरवत गिलानी, रस्टी फारुक, सलमान पीरजादा आणि सोहेल समीर यांनी जॉयलँड चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
चित्रपटाचं कथानक
पितृसत्तेवर भाष्य करणारा 'जॉयलँड' हा सिनेमा आहे. आपल्या आपत्यांना मुलगा व्हावा अशी अपेक्षा असणाऱ्या कुटुंबावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. कुटुंबातील लहान मुलगा गुपचूप इरॉटिक डान्स थिएटरमध्ये सामील होतो जिथे तो एका ट्रान्सजेंडर महिलेच्या प्रेमात पडतो. यातूनच कुटुंबात मतभेद निर्माण होतात. आता या चित्रपटाचंही प्रियांकाने कौतुक केलं.
प्रियांकाचे आगामी चित्रपट
प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. तसेच कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: