Ved Box Office Collection : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा 'वेड' (Ved) हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन-


रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड या चित्रपटाने ओपनिंग-डेला 2.25 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 3.25 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4.50 कोटी कमावले. आता चित्रपट रिलीज होऊन 18 दिवस झाले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत 48.70 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. 


जिनिलियाने वेडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची पोस्ट शेअर केली आहे. 'एवढं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद' असं कॅप्शन जिनिलियाने या पोस्टला दिलं आहे. 






'वेड' मधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती 


वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, सुख कळले, बेसुरी या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. वेड चित्रपटातील रितेश आणि जिनिलिया यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. जिनिलिया आणि रितेश हे गेली 20 वर्षे सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Genelia Deshmukh: 'टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं...'; जिनिलियाची खास पोस्ट