Joyland Release Date: पाकिस्तानमधील (Pakistan) अधिकाऱ्यांनी चित्रपट निर्माता सॅम सादिक (Saim Sadiq) यांच्या 'जॉयलँड' (Joyland) चित्रपटावरील बंदी हटवली आहे. आता हा चित्रपट शुक्रवारी (18 नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. सॅम सादिक यांनी 4 नोव्हेंबरला 'जॉयलँड' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. त्यानंतर या सिनेमावर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली. पण आता ही बंदी हटवण्यात आली आहे.
'जॉयलँड' मध्ये दाखवण्यात आलेल्या दृष्यांना केला जात होत विरोध
'जॉयलँड' चित्रपटाच्या दृष्यांचा पाकिस्तानमधील लोकांनी विरोध केला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, "चित्रपटात अत्यंत आक्षेपार्ह दृष्य असल्यानं काही लोकांनी चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली आहे. समाजासाठी हे योग्य नाही"
18 नोव्हेंबरला चित्रपट होणार रिलीज
बुधवारी (16 नोव्हेंबर) राफे महमूद यांनी एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'सेन्सॉर बोर्डाने जॉयलाँडमधील काही सिन्स कट करून हा चित्रपट संपूर्ण पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज होऊ शकतो. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन'
'जॉयलँड' हा चित्रपट पाकिस्तानकडून अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला आहे. 'जॉयलँड' हा सिनेमा कान्स फिल्म फेस्टिव्हलसह अनेक परदेशी फिल्म फेस्टिव्हलसमध्ये दाखवण्यात आला आहे.
काय आहे चित्रपटाचं कथानक?
पितृसत्तेवर भाष्य करणारा 'जॉयलँड' हा सिनेमा आहे. आपल्या आपत्यांना मुलगा व्हावा अशी अपेक्षा असणाऱ्या कुटुंबावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. कुटुंबातील लहान मुलगा गुपचूप इरॉटिक डांन्स थिएटरमध्ये सामील होतो जिथे तो एका ट्रान्सजेंडर महिलेच्या प्रेमात पडतो. यातूनच कुटुंबात मतभेद निर्माण होतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Joyland : पाकिस्तानच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशिकेला पाकिस्तानातच बंदी