Ideas Of India 2024: बॉलीवूड अभिनेत्रींपैकी करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही देखील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. तिने तिच्या प्रत्येक पात्रात तिचं अभिनयाचं कौशल्य सिद्ध केलं आहे. नुकतच करिना कपूरने एबीपी नेटवर्कच्या 'आयडीयाज् ऑफ इंडिया' (Ideas of India 2024) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी तिने मुलांना प्रसिद्धी कशा प्रकारे हाताळायला शिकवते यावर भाष्य केलं.
दरम्यान करिना ही तिचं कुटुंब आणि तिचं करियर यांचा मेळ सांधताना पाहायला मिळते. यावर देखील करीनाने भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, प्रत्येकजण हे करू शकतो मग तो पुरुष असो किंवा स्त्री. पण मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे मी आनंदी आहे आणि आनंद ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त आनंदच मानसिक स्थैर्य देऊ शकतो. जर आनंद नसेल तर नाव, प्रसिद्धी, पैसा, , करिअर, घर, कुटुंब सगळंच उद्ध्वस्त होतं.
करीना तैमूरला शिकवतेय प्रसिद्धी कशी हाताळायची
करीना कपूर खान आणि सेफअली खान यांची दोन्ही मुलं कायमच चर्चेत असतात. तसेच आईवडिलांप्रमाणे मुलंही सध्या प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागली आहे. यावर बोलताना करीना म्हणाली की, मी याकडे फारसं लक्ष देत नाही. जर मी हायपर झाले, जी मी आहे आणि जर मी ते बाहेर आणले तर त्याचा कुठेतरी तैमूरवर परिणाम होईल. मला काहीतरी त्रास होतोय, हे माहित असून सुद्धा जेव्हा खूप कॅमेरे लागतात तेव्हा मला कळत नाही, हे लोक असे का करत आहेत. फोटो का काढताय? पण यावर सैफने मला खूप चांगली गोष्ट शिकवली आहे. तो मला नेहमी सांगतो अशा वेळी डोकं खाली ठेऊन तिथून बाहेर पडायचं. पण, या सगळ्यापासून आपण पळून जाऊ शकत नाही. आता तैमूरला समजले आहे की त्याचे आई-वडील प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्याला या गोष्टीचं फारसं काही वाटत नाही.
कामामुळे मुलांसोबत प्रत्येक वेळेस नसल्याची करीनाला वाटते खंत
अभिनेत्री म्हणून शुटींग दरम्यान बऱ्याचदा घरापासून लांब रहावं लागतं. करीनाने म्हटलं की, कामामुळे मुलांसोबत कधी वेळ घालवायला मिळाला नाही, तर त्याची मला खंत वाटते. जेह फक्त 3 वर्षांचा असल्याने मला त्याच्या बाबतीत थोडं अपराधी वाटतं. त्याच्या शाळेतल्या परफॉर्मन्सच्या वेळी तिथे असणं मला जास्त गरजेचं वाटतं पण जर मी तिथे हजर राहू शकले नाही, त्याची मला खंत वाटते. पण मी एक काम करणारी आई असणं मला खूप जास्त आवडतं. आता तैमूरला त्याबद्दल काही वाटत नाही, कारण त्याला माहितेय की आपली आई काय करते ते, पण जेह अजून लहान आहे. त्यामुळे मी त्याच्या बाबतीत थोडी भावनिक होते.