नवी दिल्ली: देसी गर्ल प्रियांका चोप्रा आंतरराष्ट्रीय स्टार झाल्यामुळे तिचा भाव चांगलाच वधारला आहे. जिथे मोठे मोठे स्टार्स अख्ख्या सिनेमासाठी कोटींची फी घेतात, तिथे प्रियांका चोप्रा अवघ्या एक मिनिटासाठी 1 कोटी चार्ज आकारणार आहे.


कोणत्या सिनेमासाठी नाही तर एका लाईव्ह परफॉर्मन्ससाठी तिने मिनिटाला 1 कोटी घेणार असल्याचं सांगितलं आहे.

झी सिने अॅवॉर्डसाठी प्रियांका चोप्रा ही भली मोठी फी आकारणार आहे. येत्या 19 डिसेंबरला हा अॅवॉर्ड शो होणार आहे. या शोमध्ये 5 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी प्रियांका मिनिटाला 1 कोटी याप्रमाणे पैसे घेणार आहे. तिने 4 ते 5 कोटी रुपयांची मागणी आयोजकांकडे केल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, प्रियाकांने मागितलेली फी ऐकून आयोजकांनी एक पाऊल मागे घेतलं आहे.

प्रियांकाने यापूर्वी अनेक अॅवॉर्ड शोमध्ये परफॉर्म केला आहे. पिंगा सारख्या गाण्यावर तर तिने उपस्थितांना ठेका धरायला लावल्याचं आपण पाहिलं आहे.

त्यामुळे झीच्या अॅवॉर्ड शोमध्ये प्रियांकाला संधी दिली जाते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.