मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणी बुधवारी विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेण्ड मुस्तफा राज याच्याशी प्रियामणी विवाहबद्ध झाली.

प्रियामणी आणि मुस्तफा यांनी रिजस्टार ऑफिसरच्या उपस्थितीत विवाहाची प्रक्रिया पार पाडली. आता बंगळुरुतील एका अलिशान हॉटेलमध्ये नातेवाईक आणि मित्रपरिवारासाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे.

प्रियामणीने तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी अशा भाषांमधील सिनेमांमध्ये काम केले आहे. 2007 साली ‘परुथीवीरन’ या तामिळ सिनेमासाठी प्रियामणीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.

https://twitter.com/priyamani6/status/736766434915667968?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fabpnews.abplive.in%2Fbollywood%2Fpriyamani-ties-the-knot-in-a-hush-hush-ceremony-677160

विवाहनबंधनात अडकण्याआधी प्रियामणी आणि मुस्तफा यांनी एका संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. प्रियामणीची मैत्रीण पारुल यादव हिने या संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

https://twitter.com/TheParulYadav/status/900287725143703552?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fabpnews.abplive.in%2Fbollywood%2Fpriyamani-ties-the-knot-in-a-hush-hush-ceremony-677160

प्रियामणीचा पती मुस्तफा राज मुंबईतील उद्योगपती असून, सेलिब्रिटी क्रिकेट लीगची कल्पना त्याचीच असल्याचं बोललं जातं.