Prashant Damle : मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ अशी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची ओळख आहे. गेल्या तीन दशकांत मोरू, माधव, मन्या, केशव, डॉ. पुंडलिक, बहरूपी, राजा, फाल्गुनराव अशा अनेक भूमिकांच्या माध्यमातून प्रशांत दामले प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकताच प्रशांत दामलेंनी 12,500 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे.
'एका लग्नाची पुढची गोष्ट'चा विनामुल्य प्रयोग!
विक्रमवीर प्रशांत दामले येत्या 6 नोव्हेंबरला 12,501 वा प्रयोग सादर करणार आहेत. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आणि स्मृतिगंधतर्फे 'एका लग्नाची पुढची गोष्ट' (Eka Lagnachi Pudhchi Gosht) या नाटकाचा विनामुल्य प्रयोग ठेवण्यात आला आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये 7 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा विनामुल्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाच्या प्रयोगाआधी प्रशांत दामलेंची विजू माने खास मुलाखत घेणार आहे. दिव्येश बापट या कार्यक्रमाच्या संयोजनाची धुरा सांभाळत आहे. प्रशांत दामलेंचा 12,501 वा प्रयोग हाऊसफुल्ल होणार आहे.
'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकात प्रशांत दामले मुख्य भूमिकेत आहेत. तर कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबुरकर, प्रतिक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अद्वैत दादरकरने या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन केले आहे.
प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकरची ऑनस्टेज’ केमिस्ट्री लय भारी!
'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे नाटक या नाटकाचं कथानक आणि खुसखुशीत गोष्ट रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे. मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी आणि त्यांची ‘ऑनस्टेज’ केमिस्ट्री 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचं खरं वैशिष्ट्य आहे. सध्या रंगभूमीवर या नाटकाचे जोरदार प्रयोग सुरू आहेत. या नाटकाचा प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होत असतो. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
तांत्रिक बदलाच्या वातावरणातही नाटकांच्या प्रेक्षक संख्येत वाढ : प्रशांत दामले
नुकत्याच एका कार्यक्रमात प्रशांत दामले म्हणाले,"मराठी नाटकांपासून नाटय़ प्रेक्षकांनी नाळ तुटलेली नाही. उलट ती घट्ट होत आहे. यापूर्वी दूरचित्रवाणी आली त्यावेळी मराठी नाटकांचे काय होणार म्हणून चर्चा होती. आता समाजमाध्यमी अनेक तंत्रस्नेही साधने आली आहेत. त्याचाही कोणताही परिणाम मराठी नाटक, प्रेक्षकांवर झालेला नाही आणि होणारही नाही".
संबंधित बातम्या