Bebhaan : रोमान्स आणि अॅक्शनचा पुरेपूर मसाला प्रेक्षकांना 'बेभान' (Bebhaan) या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे. अनुपसिंग ठाकूर, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे असा प्रेमत्रिकोण असलेला 'बेभान' हा सिनेमा 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. 


'बेभान' सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉंच करण्यात आला आहे. 'झाला बोभाटा', 'भिरकीट' असे उत्तम सिनेमे केल्यानंतर 'बेभान' हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा दिग्दर्शक अनुप जगदाळे घेऊन येत आहेत. दिनेश देशपांडे यांच्या कथेवर बेतलेल्या बेभान या चित्रपटाची पटकथा नितीन सुपेकर यांची आहे.  


अनुपसिंग ठाकूरचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण


आजवर अनेक दाक्षिणात्य सिनेमांत काम केल्यानंतर अनुपसिंग ठाकूर मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुपसिंगनं बॉडीबिल्डिंगची मिस्टर वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली होती. अनुपसिंग ठाकूर यांच्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


श्रीमंत पार्श्वभूमी असलेला नायक आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या दोन तरुणी, त्यांच्यामुळे नायकात होणारा बदल हे 'बेभान' चित्रपटाचं कथासूत्र आहे. ‘बेभान’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्यांना 11 नोव्हेंबरची प्रतीक्षा करावी लागेल.




कोरोनानंतर मराठी सिनेसृष्टीत अनेक विषयांवर विविध धाटणीच्या सिनेमांची निर्मिती सुरू आहे. आतापर्यंत अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. तर काही सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बेभान’ असे या चित्रपटाचे नाव आहे. 


ट्रेलर पाहा : 



संबंधित बातम्या


Friday Movies Release : सिनेप्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी; आज प्रदर्शित होणार 'हे' हिंदी-मराठी सिनेमे