Prasad Oak:  अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. प्रसादच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकताच प्रसादनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ओक कुटुंबाच्या नव्या घराची झलक दिसत आहे.


प्रसादच्या नव्या घराची झलक (Prasad Oak New Home)


प्रसादनं इन्साग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.ज्यामध्ये त्याच्या नव्या घराची झलक बघायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये प्रसादच्या घाराच्या बाहेरील नंबर प्लेट दिसत आहे. या पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेटवर 'ओक'असं लिहिलेलं दिसत आहे.  newhome आणि happynewyear हे दोन हॅशटॅग्स प्रसादनं या व्हिडीओला दिले आहेत. प्रसादनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करुन संपूर्ण ओक कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. 


अभिनेत्री अमृता खानविलकरनं प्रसादनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली, 'Omgggggg अभिनंदन' प्रियांका बर्वे, आदिनाथ कोठारे, स्वप्निल जोशी, सुबोध भावे, सुयश टिळक, सुकन्या मोने या कलाकारांनी देखील प्रसादनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.


पाहा व्हिडीओ:






प्रसादचे आगामी चित्रपट (Prasad Oak Upcoming Movies)


प्रसादच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या धर्मवीर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.'धर्मवीर 2 - मुक्काम पोस्ट ठाणे - भाग 2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  धर्मवीर 2 - मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडेनं केलं आहे तर या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केली आहे.प्रसादच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच प्रसादचा  'महापरिनिर्वाण' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाद्वारे प्रसाद ओकसोबतच गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर,  प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Mahaparinirvaan : 'महापरिनिर्वाण' दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’ सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट! प्रसाद ओक मुख्य भूमिकेत