RSS Vijayadashmi Utsav 2023 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात 'आरएसएस'साठी दसरा हा खास दिवस आहे. या दिवशी दरवर्षी संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपूरमधील रेशीमबागमध्ये विजयादशमी मेळावा भरवला जातो. यंदा  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विजयादशमी सोहळ्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) हजेरी लावली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  रेशीम बागेतील दसरा मेळाव्याचे फोटो आणि व्हिडीओ प्राजक्तानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओला प्रजक्तानं खास कॅप्शन देखील दिलं आहे.


प्राजक्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "आज आयुष्यात पहिल्यांदा “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा - विजयादशमी उत्सव” अनुभवता आला. ते ही ‘केंद्रिय मंत्री - नितीनजी गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस’ यांच्या समवेत.समस्त संघ परिवाराचे यासाठी मनापासून आभार."  शंकर महादेवन यांनी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात हजेरी लावली होती.


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


प्राजक्तानं शेअर केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यातील फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हे संकेत आहे की, लवकरच तुझी भाजपमध्ये एन्ट्री होणार' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,  'महाराष्ट्र दौऱ्यावर आहेस वाटत?  मराठवाड्यानंतर लगोलग विदर्भ की काय?'






प्राजक्ता ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. प्राजक्ता ही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. तसेच तसेच तिचा लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्राजक्ताबरोबरच या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती.  जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा  'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट देखील रिलीज झाला होता. या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे यांनी प्रमुख भूमिका साकारली.






इतर महत्वाच्या बातम्या:


Mohan Bhagwat : लोकसभेत जनतेला सावध राहण्याचं आवाहन ते इंडिया आघाडीवर नाव न घेता टीका; मोहन भागवतांच्या भाषणातील 10 मुद्दे