Prajaktta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. प्राजक्ताच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकताच प्राजक्तानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता ही तिच्या कुटुंबासोबत 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे. प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


'जमाल कुडू' गाण्यावर प्रजाक्ताचा जबरदस्त डान्स


प्राजक्तानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती कुटुंबासोबत अॅनिमल या चित्रपटामधील 'जमाल कुडू' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. प्राजक्तानं डोक्यावर एक ग्लास ठेवलेला दिसत आहे. तसेच प्राजक्तानं तिच्या कुटुंबासोबत 'मै हूं डॉन' या गाण्यावर देखील डान्स केला. व्हिडीओमध्ये प्राजक्ता ही चुलीजवळ बसून भाकऱ्या थापताना देखील दिसत आहे. या व्हिडीओला प्रजक्तानं कॅप्शन दिलं,  "About 31st December, आमचे बॅाबी देओलs आणि डॉनs… यात माझा 2023 चा शेवटचा सेल्फी आणि 2024 चा पहिला सेल्फी देखील आहे."


पाहा व्हिडीओ:






नेटकऱ्यांच्या कमेंट्स


प्राजक्तानं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे. एका नेटकऱ्यानं प्राजक्ताच्या व्हिडीओला कमेंट केली, "प्राजक्ता..खूपच भारी आहेस तू.कुटुंबाबरोबर जे तुझे क्षण असतात त्यांत तू खूप खुश, सुंदर दिसतेस. प्राजक्ता सर्व गुण संपन्न मुलगी." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "असेच क्षण जपायचे असतात प्राजक्ता आणि तू ते खुप भारी जपतेस That's we love you .  तू भाकरी करतानाचा पूर्ण व्हिडीओ टाक ना . मी मागे म्हटले होते ना की तु a॥ rounder आहेस तला भाकरी करतांना पाहून ते सिद्ध झाले."


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येते. या कार्यक्रमाचं ती सूत्रसंचालन करते.जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा  'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट देखील रिलीज झाला होता. या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे यांनी प्रमुख भूमिका साकारली. प्राजक्ताच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Prajaktta Mali: प्राजक्तानं शेअर केले खास लूकमधील फोटो; म्हणाली, "अखिल भारतीय 'सिंगल' संघटनेचे सदस्य..."