Prajakta Gaikwad: स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमधून आपल्या अभिनयाची छाप सोडत तमाम मराठी भाषिक प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, अभिनयाने परिपूर्ण अशी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) "काटा किर्रर्र" या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.  प्रेम करण्यासाठी कोणत्याच गोष्टींच्या बंधनाची गरज नसते, आणि जिथे कोणत्याही प्रकारचे बंधने येतात तिथे प्रेम कधीच होत नाही. काटा किर्रर्र चित्रपटामध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं  मोहिनी ही भूमिका साकरली आहे. आपल्या भावावर म्हणजेच चित्रपटामधील मुख्य कलाकार कांतावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्याच्या पाठीशी उभी राहून त्याच्या साठी झगडणारी अशी बहीण आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळेल. आपल्या परिपूर्ण अशा अभिनय कौशल्याने प्राजक्ता गायकवाड हिने मोहिनी या भूमिकेला साजेसा न्याय मिळवून दिला आहे.


प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमधून येसूबाईंची नाविन्यपूर्ण अशी भूमिका साकारत सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगेळे असे स्थान मिळवले आहे. याच प्रेमाची परतफेड करत प्राजक्ता गायकवाड काटा किर्रर्र मधून पुन्हा एकदा आपले मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेला साजेसा असा अभिनय करणारी हि हरहुन्नरी अभिनेत्री नेहमीच तिच्या कामामध्ये शंभर टक्के देत आलेली आहे, याच उत्तम उदाहरण आपल्याला काटा किर्रर्र मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे.
 
प्रेम आणि करियर या नाजूक अशा विषयावर भाष्य करत दिग्दर्शक जितेंद्र वाईकर यांनी दिग्दर्शनाची बाजू खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. तसेच चित्रपटामध्ये निर्माते सतीश देवकर स्वतः मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे, त्याचसोबत स्नेहा कुडवाडकर, कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, आणि विशाल चव्हाण यांसारखे दमदार कलाकार सुद्धा आपल्या भेटीला येणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचे दमदार असे, काटा किर्रर्र हे  गाणं सोशल मिडिया वर गाजत असून या तडफदार गाण्याला आनंद शिंदे यांनी आवाज दिला आहे. प्रेम आणि संघर्ष यासारख्या नाजूक विषयावर भाष्य करणारा "काटा किर्रर्र" हा चित्रपट 14 ऑक्टोबर २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 






वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Timepass 3 : दगडू आणि पालवी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'टाइमपास 3'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर