Adipurush OTT: अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) यांचा 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून 'आदिपुरुष' या चित्रपटाची टीम चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज होणार आहे. थिएटर रिलीजनंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या मेकर्सनं एका ओटीटी प्लॅटफॉर्मबरोबर कोट्यवधींची डील केली आहे, असं म्हटलं जात आहे.
आदिपुरुष चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर जवळपास 50 दिवसांनी 'आदिपुरुष' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. यासाठी 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या मेकर्सनं 250 कोटी रुपयांची डील केली आहे, असं म्हटलं जात आहे.
आदिपुरुषनं रिलीज आधीच कमावले कोट्यवधी रुपये
एका रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' या चित्रपटामं रिलीज आधीच 432 कोटींचा गल्ला जमवला आहे. थिएट्रिकल राइट्स, सॅटेलाइट राइट्स, म्यूझिक राइट्स, डिजिटल राइट्स अशा अनेक गोष्टींमधून या चित्रपटाने रिलीजआधीच चांगलीच कमाई केली आहे.
आदिपुरुष चित्रपटामधील गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं
काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटातील जय श्री राम हे गाणं रिलीज झालं. जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच या चित्रपटातील राम सिया राम हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. जय श्री राम आणि राम सिया राम या आदिपुरुष चित्रपटामधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: