Adipurush Advance Booking : 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाची देशभरात चांगलीच क्रेझ आहे. 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी या सिनेमाचे 36,000 पेक्षा अधिक तिकीटे विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. 


'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. वेगवेगळ्या कारणाने या सिनेमावर टीका होत होती. पण तरीही या सिनेमाची चाहत्यांमध्ये आणि सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 


अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी विकले गेले 36,000 तिकिटे


'आदिपुरुष'च्या अॅडव्हान्स बुकिंगला 11 जूनपासून सुरुवात झाली आहे. भूषण कुमार निर्मित आणि ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमाचे पीवीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसचे मिळून 36,000 तिकिटे विकले गेले आहेत. फक्त हिंदी वर्जनमधून हा सिनेमा 1.40 कोटींची कमाई करू शकतो, असे म्हटले जात आहे. 






'या' सिनेमांना मागे टाकण्यासाठी 'आदिपुरुष' सज्ज!


कोरोनाकाळानंतर 'पठाण', 'द कश्मीर फाइल्स' आणि 'आरआरआर' या सिनेमांनी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. 'पठाण', 'केजीएफ 2' आणि 'ब्रह्मास्त्र', 'आरआरआर' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. त्यामुळे आता 'आदिपुरुष' हा सिनेमा या सिनेमांचे रेकॉर्ड मोडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


रामायणावर आधारित असलेला 'आदिपुरुष'!


'आदिपुरुष' या सिनेमात प्रभास (Prabhas), कृती सेनन (Kriti Sanon) , सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि देवदत्त नागे (Devdatta Nage) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात प्रभास रामाच्या, कृती सेनन सीता मातेच्या, सैफ अली खान रावणाच्या आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे रामायणावर आधारित असलेल्या या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ओम राऊत, कृती सेनन आणि प्रभास सध्या 'आदिपुरुष' या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. आदिपुरुष' हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Adipurush : 'या' दिवशी 'आदिपुरुष'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला होणार सुरुवात; रणबीर कपूर विकत घेणार 10,000 तिकीट