Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितने वडिलांचा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. जुन्या आठवणींना उजाळा देणारी पोस्टदेखील तेजस्वीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील खास असतात. तेजस्विनीसाठीदेखील तिचे वडील खास आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तिने जुन्या आठवणी शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. 


तेजस्विनी पंडितने फोटो शेअर करत लिहिले आहे,"मला अनेकांनी विचारलं तुझ्याकडील मौल्यवान ठेवा काय आहे? घड्याळ, अंगठ्या, कपडे,पर्स की आणखी काही...काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल... तर या दोन गोष्टी आहेत. माझं माझ्या बाबांवरचं प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. बाबाने मला माणूस म्हणून घडवलं आहे. बाबाने मला संस्कारासोबत आणखी काय दिलं तर एक चांगला कूक होण्याचा वारसा बाबा देऊन गेला, ठेऊन गेला".





तेजस्विनीने पुढे लिहिले आहे,"हे दोन चमचे आमच्याकडे माझा जन्म झाला तेव्हापासून आहेत. बाबा कॅटरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. त्यासोबत आमचं चहाचंदेखील दुकान होतं. त्यामुळेच बाबांनी सगळ्यात आधी आम्हा बहिणींना चहा करायला शिकवला. आमच्याकडे चहा वेगवेगळ्या पद्धतीने बनतो. त्या चहापावडरच्या मापाचा हा एक चमचा. दुसरा तो साखरेचा चमचा. त्याची दांडी तुटली आहे. पण आजतागायत तो चमचा बदललेला नाही. हे चमचे फक्त माझ्या बाबची आठवण नसून आमच्या संस्कारातल्या, शिकवणीचं प्रमाण आहे. तोलुन मापून चहा करता येईल, पण बाबावरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य".


संबंधित बातम्या


Natak : 'दादा एक गुड न्यूज आहे', सावित्रीबाई फुले रंगमंदिरात दोन वर्षांनी झळकला 'हाऊस फुल्ल'चा फलक


Shubhangi Gokhale : अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha