Virat-Anushka : विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे भारतातील सेलिब्रिटी जोडप्यांपैकीच एक मानले जातात. 2017 साली दोघे विवाहबंधनात अडकले होते. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात. विराटने नुकतीच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर अनुष्कासाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याने अनुष्कासोबतचा एक गोड फोटोदेखील शेअर केला आहे.
विराटने अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे. दोघेही पर्वतरांगा आणी नदीचा आनंद घेताना दिसत आहेत. कोहलीने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिली आहे,"मी तुझ्या कायम पाठीशी आहे". विराटचे हे लक्षवेधी कॅप्शन चाहत्यांना चांगलेच आवडत आहे. विराट आणि अनुष्काच्या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
विराय आणि अनुष्का आता लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करणार आहेत. 11 डिसेंबरला त्यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण होणार आहेत. विराटने नुकताच अनुष्का आणि वामिकासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
मांजरीला मांडीवर घेऊन बसलेला विराटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरलविराटने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. त्यात तो मैदानात अचानक शिरलेल्या एका मांजरीला मांडीवर घेऊन बसलेला दिसत होता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha