Baburaj:  मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता बाबूराजला (Baburaj) आज (शनिवार) पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. इडुक्की (Idukki) जिल्ह्यातील अदिमाली पोलीस स्टेशनमध्ये (Adimali Police Station) बाबूराजच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बाबूराजला अटक करण्यात आली. 


काय आहे प्रकरण? 


बाबूराज हा इडुक्की (Idukki) जिल्ह्यातील एका रिसॉर्टचा मालक आहे. त्यानं हे रिसॉर्ट 2020 मध्ये अरुण नावाच्या व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिले होते. नंतर कोरोना काळातील निर्बंध हटल्यानंतर अरुणनं हे रिसॉर्ट सुरु केले. रिसॉर्ट सुरु झाल्यानंतर अरूणला तिथे काही टेक्लिकल प्रॉब्लेम्स जाणवले. रिसॉर्टच्या काही क्षेत्राच्या नावामध्ये अरूणला प्रॉब्लेम वाटला. अरूणनं केलेल्या तक्रारीनुसार, याबाबत बाबूराजनं त्याला कोणतीही पूर्व माहिती दिली नव्हती. त्यामुळे अरुणनं बाबूराजला त्याचे पैसे परत मागितले. पण बाबूराजनं ते पैसे देण्यात नकार दिला. त्यामुळे अरुणनं बाबूराजच्या विरोधात तक्रार दाखल केली. 


बाबूराजला (Baburaj) पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. केरळ (Kerala) उच्च न्यायालयाने त्याला शनिवारी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सरकारी रुग्णालयात नेले. 


बाबूराजचे चित्रपट 


बाबूराज हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यानं सॉल्ट अँड पेपर (Salt N' Pepper), मायामेहिनी (Mayamohin), हनी बी (Honey Bee) या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बाबूराजनं अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. तसेच त्यानं काही विनोदी भूमिका देखील साकारल्या आहेत. बाबूराजनं 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॅक कॉफी (Black Coffee) या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केलं आहे. 1994 मध्ये रिलीज झालेल्या भीष्माचार्य या मल्याळम चित्रपटामधून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 


बाबूराज हा सोशल मीडियावर देखील विविध पोस्ट शेअर करत असतो. त्याच्या आगामी चित्रपटांची माहिती तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देतो. तसेच जिममधील फोटो देखील बाबूराज सोशल मीडियावर शेअर करतो. त्याला अनेक नेटकरी सोशल मीडियावर फॉलो करतात. तर काही युझर्स त्याच्या पोस्टला लाइक आणि कमेंट करत असतात. 






महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Manipur: इंफाळमधील फॅशन शोच्या ठिकाणाजवळ स्फोट, सनी लिओनी लावणार होती हजेरी