K Pop Singer Haesoo : कोरियन संगीतक्षेत्रामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. के-पॉप (K Pop) सिंगर हासूचं (Haesoo) निधन झालं आहे. तिनं वयाच्या 29 वर्षी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्टनुसार, हासू ही एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळली. पोलिसांना एक पत्र देखील सापडले.
हसू ही कोरियन संगीतक्षेत्रामधील लोकप्रिय गायक होती. तिने 2019 मध्ये 'माय लाइफ मी' या मिनी-अल्बममधून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर तिची अनेक गाणी रिलीज झाली. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ती 20 मे 2023 रोजी वांजू गन, जिओलाबुक-डो येथे ग्वांगजुमियोन पीपल्स डे कार्यक्रमात गाणं सादर करणार होती. मात्र, तिच्या निधनामुळे त्या कार्यक्रमाला ती उपस्थित राहणार नसल्याचा फोन त्या आयोजकांना आला. हसूच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
चाहत्यांमध्ये पसरली शोककळा
हसूचा जन्म डिसेंबर 1993 मध्ये झाला होता. तिने कोरियन संगीताचा अभ्यास केला होता. हसूचा चाहता वर्ग मोठा होता. हसूच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हासूला श्रद्धांजली वाहिली आहे.
काही दिवसांपूर्वी मून बिननं घेतला होता जगाचा निरोप
काही दिवसांपूर्वी कोरियन सिंगर एस्ट्रो स्टार मून बिनचे ( Moon Bin) निधन झाले. मून बिनचे वयाच्या 25 व्या वर्षी निधन झाले आणि त्यांच्या आकस्मिक निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. 19 एप्रिल रोजी मून बिनचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळला होता. त्याच वेळी, मून बिनच्या आकस्मिक मृत्यूनंतर सुमारे तीन आठवड्यांनंतर, आता के-पॉप गायक हसूचे निधन झाले आहे.
संबंधित बातम्या