Rakhi Sawant on Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) निधनाचं वृत्त अफवा असल्याचं समोर आलं आहे. लोकांमध्ये सर्वाइकल कॅन्सरची (Cervical cancer) जनजागृती करण्यासाठी अभिनेत्रीने मोठं पाऊल उचललं आहे. अशातच आता पूनमची खास मैत्रीण राखी सावंतची (Rakhi Sawant) प्रतिक्रिया समोर आली आहे.


राखी सावंत म्हणाली,"पूनम तू तर आम्हाला मोठा धक्काच दिला होतास. तू वेडी आहेस का? स्वत:च्या मरणाचा पब्लिसिटी स्टंट कोण करतं? माध्याम, चाहतावर्गासह माझ्याही भावनांचा तू खेळ केलास. आणि आता जिवंत असल्याचा व्हिडीओ बनवला आहेस. नक्की सुरू काय आहे तुझं? तुझ्या निधनाने मी दु:खी झाले होते".






राखी सावंत पुढे म्हणाली,"माझा रिल व्हिडीओ मला सोशल मीडियावर शेअर करायचा होता. पण माझ्या मैत्रीणीचं निधन झालं आहे. आज मी काहीही चांगलं काम करणार नाही असं म्हणत मी तो व्हिडीओ शेअर केला नाही. तुझ्यामुळे मी खूप दु:खी झाले होते. मला अश्रू अनावर झाले होते. तुझ्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. मी तुला कितीवेळा फोन केले. तू एकही उचलला नाहीस. तू नॅनो कार आहेस आणि मी मर्सिडिज आहे. पण तू आनंदी राहा..छान आयुष्य जग..पुन्हा असं वागू नको".


पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर एकीकडे चाहत्यांना मोठा धक्का बसला तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट आहे, अशी शक्यता वर्तवली होती. तसेच जागतिक कर्करोग दिनानिमित्त 
(World Cancer Day) तिने ही पोस्ट केली असेल, असाही अंदाज बांधला जात होता. आता अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. निधनाची बातमी येण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत पूनम शूटिंग करत होती.


पूनमच्या वर्कफ्रंटबद्दल जाणून घ्या...


पूनम पांडेने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'लॉकअप' कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. या कार्यक्रमानंतर ती चांगलीच अॅक्टिव्ह झाली. वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये ती स्पॉट झाली आहे. 'हनीमून स्वीट रूम नंबर 911' या सीरिजमध्ये ती शेवटची झळकली आहे. छोट्या पडद्यावरील 'आशिकी तुमसेही', 'नादानिया', फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती.


संबंधित बातम्या


Poonam Pandey : "पूनम पांडे जिवंत"; निधनाच्या अफवांना पूर्णविराम देत शेअर केला व्हिडीओ