Malaika Arora: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका ही गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. अशातच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडीओमध्ये मलायका ही अर्जुनसोबत नाही तर दुसऱ्या अभिनेत्यासोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे.


मलायकानं अर्जुन नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला रोमान्स


मलायका ही  झलक दिखला जा या कार्यक्रमाची परीक्षक आहे. काही दिवसांपूर्वी झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या मंचावर अभिनेता शोएब इब्राहिम आणि मलायका यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. शोएब आणि मलायका यांनी झलक दिखला जा या कार्यक्रमात रोमँटिक गाण्यावर डान्स केला. तसेच शोएबनं मलायकाच्या हातावर किस देखील केलं. दोघांच्या या रोमान्सनं अनेकांचे लक्ष वेधलं. 


पाहा व्हिडीओ:






मलायका म्हणाली, "पुन्हा संसार थाटणार"


'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमामध्ये फराह खाननं मलायकाला विचारलं,"2024 मध्ये तू अभिनेत्री आणि सिंगल पॅरेंट असणार की, अभिनेत्री आणि डबल पॅरेंट असणार?" फराहच्या या प्रश्नाला मलायका उत्तर देते, " त्यासाठी मला पुन्हा कोणालातरी दत्तक घ्यावे लागेल" तर  गौहर खान मलायकाला म्हणते,"तू दुसरं लग्न करणार आहेस का?". यावर मलायका म्हणते, "एखादी चांगली व्यक्ती असेल तर नक्कीच मी 100 टक्के लग्न करण्याचा विचार करेल. मला कोणी लग्नसाठी मागणी घातली तर मी पुन्हा संसार थाटेल"






'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली.मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला.   मलायका आणि अरबाज यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव अरहान खान  आहे. काही दिवसांपूर्वी अरबाजनं शूरा खानसोबत लग्न केलं. तर मलायका ही अर्जुनसोबत कधी लग्न करणार? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.


संबंधित बातम्या:


Malaika Arora Wedding : अरबाजच्या लग्नानंतर पहिली पत्नी मलायकाचा विवाहाबाबत मोठा खुलासा; म्हणाली,"पुन्हा संसार थाटणार"