मुंबई : मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यासाठी धमकावल्याप्रकरणी पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
या नोटीसच्या माध्यमातून सार्वजनिक शांततेचा भंग न करण्याची ताकीद पोलिसांनी मनसेला दिली आहे. पोलिसांनी कलम 149 अंतर्गत ही नोटीस पाठवली आहे.
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासात देश सोडा, अन्यथा परिणामांना सामोरं जा, अशी धमकी दिली आहे. शिवाय पाकिस्तानी कलाकार असलेल्या शाहरुख खानच्या 'रईस' आणि ऐश्वर्याच्या 'ए दिल है मुश्किल'च्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला आहे.
पोलिसांनी नोटीस पाठवली तरी आम्ही आंदोलन करणारच, असं अमेय खोपकर यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या