मुंबई : मुद्दा कोणताही असो, कलाकारांनाच पहिल्यांदा लक्ष्य केलं जातं, अशी प्रतिक्रिया अभिनेता रितेश देशमुखने दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांत देश सोडा अन्यथा धडा शिकवू, असं अल्टिमेटम दिलं आहे. त्यावर रितेश देशमुखने कलाकारांची बाजू मांडत त्यांचा बचाव केला आहे.

48 तासात मुंबई सोडा, पाकिस्तानी कलाकारांना मनसेची धमकी


कलाकार हे सॉफ्ट टार्गेट असतात, जे दुर्दैवी आहे. मुद्दा खरंतर वेगळा असतो, पण हा उपाय नाही. कलाकारांवर बंदी घालणं हाच उपाय असेल तर तो उपाय असूच शकत नाही, असं रितेशने उद्विग्नपणे सांगितलं.

'झी जिंदगी'वरील पाक कलाकारांच्या मालिका बंद करणार


रितेश देशमुखचा 'बँजो' हा सिनेमा कालच देशभरात प्रदर्शित झाला आहे. रवी जाधवने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

अबू आझमींचं राज ठाकरेंना थेट आव्हान


उरी हल्ल्यानंतर मनसेने भारतीय सिनेमात, मालिकांमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला आहे. 48 तासांच्या आत देश सोडण्याचं अल्टिमेटम दिलं आहे. इतकंच नाही तर शाहरुखच्या 'रईस'मध्ये माहिरा खान आणि ऐश्वर्याच्या 'ए दिल है मुश्लिक'मध्ये फवाद खान असल्याने चित्रपटांना विरोध दर्शवत प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकीही दिली आहे.

शाहरुखच्या 'रईस'ला मनसेचा विरोध