International Film Festival: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट (International Film Festival) महोत्सव अर्थात 'इफ्फी' (IFFI) ला शुभेच्छा दिल्या आहेत. उद्यापासून या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात (Goa) 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. या चित्रपट महोत्सवाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पॅनल चर्चा आणि भारतातील विविध सिनेमांचे प्रदर्शन या चित्रपट महोत्सवात केलं जाणार आहे.
यंदा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रख्यात स्पॅनिश चित्रपट निर्माते कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या महोत्सवाला मोदींनी शुभेच्छा दिल्या. माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवाबद्दल पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट शेअर केली. यामध्ये लिहिण्यात आलं की, 'इफ्फी हा भारताचा सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. इफ्फी आणि भारतीय चित्रपटांनी जागतिक मंचावर स्वत:साठी एक स्थान निर्माण केले आहे. चित्रपट महोत्सवाशी निगडीत सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 53 वा इफ्फी चित्रपट मोहोत्सव यशस्वी होवो.'
इफ्फीला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांचं खास स्क्रिनिंग असणार आहे. 'थ्री ऑफ अस', 'द स्टोरी टेलर', 'मेजर', 'सिया', 'द कश्मीर फाइल्स' हे हिंदी सिनेमे दाखवले जाणार आहेत. तसेच एस.एस राजामौलींचा 'आरआरआर' हे तेलुगू वर्जनमधील सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा 'फ्रेम', दिग्पाल लांजेरकचा 'शेर शिवराज', डॉ. सलील कुलकर्णी यांचा 'एकदा काय झालं', प्रवीण तरडे यांचा 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' आणि शेखर रणखांबे यांच्या 'रेखा' या सिनेमांचा समावेश आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: