Actor Akash Choudhary:

  आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत सेल्फी काढयाची इच्छा अनेकांना असते. अनेकवेळा चाहते अतिशय नम्रपणे कलाकाराला फोटो काढण्यासाठी रिक्वेस्ट करतात. पण सध्या एका विचित्र घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, एका कलाकाराला सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यानं चक्क बॉटल फेकून मारली.


नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये  दिसत आहे की,'भाग्य लक्ष्मी' मालिका फेम अभिनेता आकाश चौधरी (Akash Choudhary) हा चाहत्यांसोबत सेल्फी काढायला येतो. त्यानंतर  तो त्याच्या गाडीकडे जातो तितक्याच एक चाहता त्याला पाण्याची बॉटल फेकून मारतो.


व्हायरल व्हिडीओमध्ये असंही दिसत आहे की, एक व्यक्ती आकाश चौधरीसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याच्या जवळ येतो. त्यानंतर तो आकाशच्या दिशेने बॉटल फेकण्याच्या तयारीत असतो पण तो थांबतो. ते पाहिल्यानंतर आकाश म्हणतो,  "क्या कर रहा है भाई?" नंतर आकाश हा त्याच्या गाडीजवळ जात असतानाच तो व्यक्ती आकाशच्या पाठीवर बॉटल फेकून मारतो. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


आकाश चौधरीसोबत घडलेल्या या घटनेच्या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली,'ते जर अशा प्रकारचा हल्ला  करत असतील तर ते चाहते नाहीत.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'हे मूर्ख लोकांचे वागणे आहे. हे सहन करू नका.' कॉमेडियन भारती सिंहनेही देखील आकाश चौधरीच्या व्हायरल व्हिडीओला कमेंट केली. तिनं शॉकिंग इमोजी कमेंटमध्ये शेअर केल्या आहेत. 


पाहा व्हिडीओ:






जाणून घ्या आकाश चौधरीबद्दल...


'भाग्य लक्ष्मी' या मालिकेमुळे आकाश चौधरीला लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यानं 'विराज सिंघानिया' ही व्यक्तिरेखा साकारली. त्याशिवाय, 'डेटिंग इन द डार्क' आणि 'एमटीव्ही स्प्लिट्सविला 10'  या शोचा तो स्पर्धक देखील होता.


'मी असे शो नाकारले आहेत जिथे मला नको असलेले काहीतरी करायला सांगितले होते. कधीकधी मला असे वाटते की मी माझ्या मूल्यांशी तडजोड केली असती तर मी जीवनात खूप मोठ्या पदावर पोहोचलो असत.' असं एका मुलाखतीमध्ये आकाशनं सांगितलं होतं.


संबंधित बातम्या:


Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक आई होणार; बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज