Pitchers Season 2 Teaser: सात वर्षांपूर्वी युट्युबवर पिचर्स (Pitchers) या वेब सीरिजचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सीरिजला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. या सिझनच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता या सीरिजच्या निर्मात्यांनी या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची (Pitchers Season 2) घोषणा केली आहे. 


'पिचर्स सिझन 2' च्या निर्मात्यांनी या सीरिजचा टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. यावेळी हा सिझन यूट्यूब ऐवजी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज होईल. सिझन 2 चा टीझर झी-5 च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. टीझरमध्ये या सीरिजच्या पहिल्या सिझनमधील एक सिन दाखवण्यात आला आहे. या टीझरला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे, 'सात वर्ष, तीन महिने, पाच दिवसानंतर फायनली आम्ही पुन्हा परत आलो आहोत.'


'पिचर्स सीझन 2' ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. नवीन कस्तुरिया, आशिष विद्यार्थी, अभय महाजन, अभिषेक बॅनर्जी आणि अरुणभ कुमार यांच्यासोबत गोपाल दत्तही देखील या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता 'पिचर्स सीझन 2'लाही पहिल्या सीझनचं प्रेम मिळतं की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


पाहा टीझर: 






पिचर्स सिझन 2च्या टीझरला कमेंट करुन अनेकांनी या सीरिजच्या रिलीज डेटबाबत विचारलं आहे. पिचर्सच्या नव्या सिझनच्या रिलीज डेटची अजून कोणीही घोषणा केलेली नाही. ओटीटीवरील वेगवेगळ्या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच ओटीटीवर वेगवेगळ्या सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.  


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 6 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!