Divya Agarwal Relationship With Apurva Padgaonkar : 'बिग बॉस ओटीटी' फेम दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) सध्या चर्चेत आहे. दिव्याने तिच्या 30 व्या वाढदिवसादिवशी बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरसोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 


अंगठी फ्लॉन्ट करतानाचे अपूर्व सोबतचे रोमॅंटिक फोटो दिव्याने शेअर केले आहेत. फोटो शेअर करत दिव्याने लिहिलं आहे,"माझं हसणं कधी बंद होईल...कधीच नाही. नव्या आयुष्याची सुरुवात करताना योग्य जोडीदार लाभला आहे. आता मी कधीच एकटी नसेल". दिव्याच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहतेदेखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 


नऊ महिन्याआधी वरुण सूदसोबत ब्रेकअप


दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ब्रेकअप झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. तसेच ब्रेकअपनंतर त्यांच्यातील मैत्री कायम राहणार असल्याचंदेखील दिव्या म्हणाली होती. 






दिव्या आणि वरुणची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरत होती. ब्रेकअपनंतर त्यांचे चाहते नाराज झाले होते. एका रिअॅलिटी शोदरम्यान वरुणने दिव्याला प्रपोज केलं होतं. त्यानंतर अनेक वर्ष ते रिलेशनमध्ये होते. दिव्याचा होणारा नवरा म्हणजेच अपूर्व हा एक उद्योगपती आहे. 


दिव्याच्या वाढदिवसानिमित्त एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पार्टीदरम्यान अपूर्वने दिव्याला प्रपोज केलं. दिव्याचं नुकतचं 'रेशम का रुमाल' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिव्या सहभागी झाली आहे. 


संबंधित बातम्या


Divya Agarwal-Varun Sood : वरुण सूद-दिव्या अग्रवालचा ब्रेकअप! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणते...