Phone Bhoot Box Office Collection Day 1: अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khattar) आणि  सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi), कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा फोन भूत (Phone Bhoot) हा चित्रपट शुक्रवारी (4 ऑक्टोबर) रिलीज झाला. हा चित्रपट शुक्रवारी देशभरात 1000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. या हॉरर कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...


फोन भूत या चित्रपटानं पहिल्याच दिवशी दोन ते तीन कोटींची कमाई केली. चित्रपटातील संगीत प्रेक्षकांना आवडत आहे. तसेच चित्रपटातील कतरिनाचा हॉरर अंदाज, सिद्धांत आणि ईशानची खळखळून हसवणारी कॉमेडी या गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाची मिली आणि ‘डबल एक्सएल’  या चित्रपटांसोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. फोन भूत चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक जण या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तरने केली आहे.  चित्रपटात जॅकी श्रॉफ, शीबा चड्ढा आणि निधी बिश्त हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.






 'फोन भूत'  चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे.  रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ यांनी या चित्रपटाच्या कथानकाचे लेखन केलं आहे. 'फोन भूत' या सिनेमाचे शूटिंग 2020 मध्येच पूर्ण झाले आहे. 'फोन भूत' व्यतिरिक्त कतरिना सलमान खानच्या 'टायगर 3'मध्ये देखील दिसून येणार आहे. कतरिनाचा 'मेरी क्रिसमस' सिनेमादेखी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कतरिनाचा नुकताच 'सूर्यवंशी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Phone Bhoot Release Date: ‘फोन भूत’ चित्रपटाची रिलीज डेट बदलली! प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार!