Amber Heard : इलॉन मस्क यांनी (Elon Musk) ट्विटर विकत घेतलं असून ते आता ट्विटरचे नवे सीईओ बनले आहेत. मस्क यांनी ट्विटरचा पदभार स्वीकाल्यानंतर त्यांनी अनेक बदल केले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आहेत. अशातच आता इलॉन यांची एक्स गर्लफ्रेंड अर्थात हॉलिवूड अभिनेत्री एम्बर हर्डने (Amber Heard) तिचं ट्विटर अकाऊंट डिलीट केलं आहे. 


एम्बर हर्डने ट्विटरला रामराम केल्याने नेटकरी एम्बर आणि इलॉनला ट्रोल करत आहेत. एकाने एम्बरच्या ट्विटर अकाऊंटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे,"हे अकाऊंट अस्तित्वात नाही. एम्बर हर्डने तिचं अकाऊंट डिलिट केलं आहे". या ट्वीटवर यूजर्स प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे,"एम्बर स्वतःची काळजी घेत आहे ही चांगली गोष्ट आहे". तर दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे,"इलॉन यांनीच एम्बर हर्डला ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचा सल्ला दिला असणार". "ब्लू टिकसाठी तिच्याकडे पैसे भरणं तिला परवडणार नाही", अशाही कमेंट्स नेटकरी करत आहेत. 






एम्बर हर्डने ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे नेटकऱ्यांकडून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स लक्ष वेधून घेत आहेत. एम्बर हर्डसह अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटला रामराम केला आहे. 






जॉनी आणि एम्बर 2015 ते 2017 पर्यंत पती-पत्नी होते. त्यानंतर, मे 2016 मध्ये एम्बरने डेपविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला. यानंतर एम्बरने डिसेंबर 2018 मध्ये एका अमेरिकन वृत्तपत्रात एक लेख लिहिला, ज्यात स्वत:ला कौटुंबिक हिंसाचाराचा बळी असल्याचं सांगितलं. यावर जॉनी डेपने एम्बरविरुद्ध खटला दाखल केला आणि 50 दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई मागितली होती. प्रत्युत्तरादाखल एम्बरने शारीरिक हिंसा आणि छळाचा दावाही करत 100 दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई मागितली होती.


‘हॉट टेक: द डेप/हर्ड ट्रायल’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला


सहा आठवड्यांच्या मीडिया ट्रायलनंतर जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यातील प्रकरण सोडवण्यात आले. या खटल्यावर आधारित 'हॉट टेक: द डेप/हर्ड ट्रायल' नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात जॉनी डेपच्या भूमिकेत अभिनेता मार्क हापका आणि अभिनेत्री एम्बर हर्डच्या भूमिकेत मेगन डेव्हिस झळकणार आहेत.


संबंधित बातम्या


Johnny Depp-Amber Heard: जॉनी डेप-एम्बर हर्ड प्रकरण आता जगभरात पाहता येणार, मानहानीच्या खटल्यावर आधारित ‘हॉट टेक : द डेप/हर्ड ट्रायल’चा ट्रेलर रिलीज!