मुंबई : कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरची नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर भारतातली पहिली लाईव्ह कॉन्सर्ट झाली. या कॉन्सर्टसाठी चाहत्यांनी हजारो रुपयांची तिकीटं खरेदी केली. मात्र या कॉन्सर्टनंतर जस्टिन बिबरवर आता टीका होऊ लागली आहे.


सोशल मीडियावर जस्टिन बिबरविषयी चाहते संताप व्यक्त करत आहेत. काहींच्या मते बिबरने कॉन्सर्टमध्ये केवळ लिप सिंक केलं. कॉन्सर्ट चालू असतानाच काही चाहत्यांनी ट्विटरवर ही माहिती शेअर केली. केवळ लिप सिंकसाठी एवढा खर्च कशाला, असा सवालही अनेकांनी केला.

https://twitter.com/Black_Wayfarer/status/862388782116425729

लाईव्ह शो चालू असताना बिबर मध्येच पाणी पिण्यासाठी थांबला. तेव्हाही म्युझिक चालूच होतं, असा आरोपही अनेक चाहत्यांनी केला. तर काहींनी व्यवस्थापनावरुनही कॉन्सर्टवर टीका केली आहे.

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये लिप सिंकचा वाद हा नवा नाही. अनेक सेलिब्रिटी केवळ लिप सिंक करुन चाहत्यांचं मनोरंजन करतात. दरम्यान बिबरने संपूर्ण कॉन्सर्टमध्ये लिप सिंक नाही केलं, तर काही गाणी स्वतःही गायली. स्टेजवर गिटार वाजवून आणि टीमसोबत डान्स करुनही त्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं.