मुंबई : पॉप सिंगर जस्टिन बिबरची कॉन्सर्ट संपली असली, तरी त्याची चर्चा अजूनही सुरुच आहे. अर्थात या चर्चा जशा जस्टिनच्या स्तुतीच्या आहेत, तशाच त्याच्या कॉन्सर्टला नावं ठेवणाऱ्याही आहेत. अभिनेत्री सोनाली बेंद्रेने जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टला ‘वेस्ट ऑफ टाईम’ म्हटलं आहे.


जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टला हजेरी लावून परतलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली. या कॉन्सर्टबाबत निराशा व्यक्त करत सोनाली बेंद्रे म्हणाली, जस्टिनची कॉन्सर्ट म्हणजे ‘वेस्ट ऑफ टाईम’ होती.

https://twitter.com/iamsonalibendre/status/862385346188726273?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fabpnews.abplive.in%2Fbollywood%2Fjustin-bieber-concert-damned-as-waste-of-time-by-sonali-bendre-615158

आपल्या मुलांसाठी जस्टिनच्या कॉन्सर्टसाठी गेले होते. शिवाय, आई होण्याची जबाबदारी पार पाडली, असेही सोनाली बेंद्रेने इन्स्टाग्रामवरुन सांगितले.



केवळ सोनाली बेंद्रेच नव्हे, बिपाशा बसूनेही कॉन्सर्टबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कॉन्सर्टच्या धामधुमीत बिपाशाला योग्य प्रकारे सुरक्षा मिळाली नव्हती.

दरम्यान, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टला बॉलिवूडमधील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये आलिया भट्ट, मलायका अरोरा, रविना टंडन, उर्वशी रौतेला, अरबाज खान, श्रीदेवी यांसारख्या सर्वच सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली.