Celebs Reaction On Pele Death : महान फुटबॉलपटू पेले (Pele) यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. विविध स्तरातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनीदेखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 


पेले यांच्या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) ते अभिनेता विकी कौशलपर्यंत (Vicky Kaushal) अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. करीनाने इंस्टा स्टोरीवर पेले यांचा फोटो ठेवला आहे. या फोटोवर 'किंग' असं लिहिलेलं आहे. 




बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) सोशल मीडियाच्या माध्यमातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तिने लिहिलं आहे,"लीजंड पेले RIP". विकी कौशलनेदेखील (Vicky Kaushal) पेले यांचा एक फोटो शेअर करत शोक व्यक्त केला आहे. 






'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री मुनमुन दत्तानेदेखील (Munmun Dutta) पेले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मुनमुनने लिहिलं आहे,"माझ्या वडिलांचा आवडता खेळाडू... पेले...भावपूर्ण श्रद्धांजली". 'कुत्ते' (Kuttey) फेम अर्जुन कपूरनेदेखील पेले यांचा फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे. 


ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट मानलं जात होतं. त्यांना अगदी फुटबॉलचा देवही म्हटलं जायचं. ते फुटबॉल कारकिर्दीत फॉरवर्ड म्हणून खेळत असंत, त्यांना सर्वकालिन महान फुटबॉलपटू असंही म्हटलं जातं. फिफानेही पेले यांना महान खेळाडूचं लेबल दिलं होतं. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू मानले जात होते.


संबंधित बातम्या


Pele : महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, फुटबॉल जगतावर शोककळा