नवी दिल्ली : बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळलेले पीपली लाईव्ह चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी यांना सात वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आहे. अमेरिकन महिलेवर रेप केल्याप्रकरणी दिल्ली कोर्टाने फारुकींना शिक्षा सुनावली आहे.

 
जून 2015 मध्ये 35 वर्षीय अमेरिकन महिलेने फारुकींविरोधात न्यू फ्रेण्ड्स कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. दिल्लीतील सुखदेव विहारमध्ये फारुकींनी बलात्कार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी सात वर्षांचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपये महिलेला देण्याचे आदेश दिले आहेत.

 
रक्कम देण्यास असमर्थ ठरल्यास तीन महिन्यांचा अधिक तुरुंगवास भोगावा लागेल. दारुच्या अंमलाखाली फारुकी यांनी बलात्कार केल्याचं कोर्टात सिद्ध झालं होतं. पीपली लाईव्ह सिनेमाची मुख्य दिग्दर्शक अनुषा रिझवी या महमूद यांच्या पत्नी आहेत.