Pathaan Box Office Collection Day 8:  गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात 'पठाण' (Pathaan) फिवर पाहायला मिळत आहे. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण या चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुखनं पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आठ दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...


पठाणचं कलेक्शन 


सिद्धार्थ आनंदनं दिग्दर्शित केलेल्या पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजेच, बुधवारी (1 फेब्रुवारी) 18 कोटींची कमाई केली आहे. रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करुन पठाणच्या कलेक्शनची माहिती दिली आहे. लवकरच हा चित्रपट 350 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. 


#Pathaan early estimates for All-India Nett for Day 8 is around ₹ 18 Crs..


— Ramesh Bala (@rameshlaus) February 2, 2023









रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 'पठाण' चित्रपटानं 55 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी, चौथ्या दिवशी 51.50 कोटी आणि पाचव्या दिवशी 65 कोटींची कमाई केली आहे. तसेच, सहाव्या दिवशी या चित्रपटानं  भारतामध्ये 25 कोटींचे कलेक्शन केलं आहे. मंगळवारी (31 जानेवारी) या चित्रपटानं 23 कोटींचे कलेक्शन केलं आहे.






पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :  


Pathaan : 'बेशरम रंग' ते बॉयकॉटच्या धमक्या! अ‍ॅक्शन आणि फाईट सीक्वेन्सची उत्कृष्ट बांधणी; जाणून घ्या शाहरुखच्या 'पठाण'च्या यशाचं रहस्य काय?