Pathaan Box Office Collection:  अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पठाण   (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. पठाण हा चित्रपट भारताबरोबरच परदेशात देखील कोट्यवधींची कमाई करत आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पठाण चित्रपट रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. सात दिवसात या चित्रपटानं भारतामध्ये 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं सात दिवसांचे कलेक्शन... 


सात दिवसांमध्ये केली एवढी कमाई 


भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी 'पठाण'ने 55 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी, चौथ्या दिवशी 51.50 कोटी आणि पाचव्या दिवशी 58.50 कोटींची कमाई केली आहे. तसेच सहाव्या दिवशी या चित्रपटानं पठाणनं सहाव्या दिवशी भारतामध्ये 25 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता मंगळवारी (31 जानेवारी) या चित्रपटानं 21 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता या चित्रपटाची एकूण कमाई 300 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. सात दिवसात या चित्रपटानं भारतात 328.25 कोटींची कमाई केली आहे. 






या चित्रपटांना टाकले मागे 


तरण आदर्शच्या ट्वीटनुसार, पठाण चित्रपटानं 300 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात लवकर सामील होणारा चित्रपट ठरला आहे. बाहुबली-2 हिंदी (10 दिवस), 'केजीएफ 2' हिंदी (11 दिवस), दंगल (13 दिवस), संजू (16 दिवस), टायगर जिंदा है (16 दिवस), पिके (17) वॉर (19), बजरंगी भाईजान (20 दिवस), सुल्तान (35 दिवस)  या चित्रपटांना मागे टाकत पठाण हा सर्वात कमी दिवसात 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला आहे.


पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच, या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Pathaan : 'बेशरम रंग' ते बॉयकॉटच्या धमक्या! अ‍ॅक्शन आणि फाईट सीक्वेन्सची उत्कृष्ट बांधणी; जाणून घ्या शाहरुखच्या 'पठाण'च्या यशाचं रहस्य काय?