Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणीच्या (Kiara Advani) लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. 


मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Date) येत्या 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. पण येत्या काही दिवसांत ते लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य करतील असे म्हटले जात आहे. 


लग्नसोहळ्याच्या तयारीला दिल्लीत सुरुवात!


सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत दिल्लीत आहे. सिद्धार्थच्या दिल्लीतील घरी लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत सिद्धार्थ कुटुंबियांसोबत लग्नसोहळ्यात राजस्थानला रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सिद्धार्थ आणि कियारा राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 


कियारा आडवाणीच्या घरीदेखील लग्नसोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. सजावटीपासून ते लग्नसोहळ्यातील आऊटफिटपर्यंत प्रत्येक गोष्टीवर कियाराचं लक्ष आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यातील आऊटफिट मनीष मल्होत्रांनी डिझाईन केला आहे. 






'या' ठिकाणी कियारा-सिद्धार्थ अडकणार लग्नबंधनात (Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Venue)


मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी राजस्थानातील जैसलमेरमध्ये पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. हळद, मेहेंदी, संगीत सोहळ्याला येत्या दोन-तीन दिवसांत सुरुवात होणार आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कुटुंबियांसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यात करण जौहर, मनीष मल्होत्रा, अश्विनी यार्डीसह अनेक सेलिब्रिटी कियारा-सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 


सिद्धार्थ-कियाराचे आगामी सिनेमे (Sidharth Malhotra Kiara Advani Upcoming Project) 


कियाराचा 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात ती विकी कौशलसोबत (Vicky kaushal) स्क्रीन शेअर करताना दिसली होती. सध्या कियारा 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki katha) या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. कियाराचा 'आरसी 15' (RC15) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थचा 'मिशन मजनू' (Mission Majnu) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या तो 'योद्धा' या सिनेमाचं शूटिंग करत आहे.


संबंधित बातम्या


Sidharth Kiara Marriage: 'लव्ह बर्ड' सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, राजस्थानमध्ये घेणार सात फेरे